Image
  22 डिसेंबर 2012 रोजी, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात घोषणा केली की, दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. . अशा प्रकारे दरवर्षी 22 डिसेंबर 2012 पासून देशभरात राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जात आहे.

IAS Officer होण्याच स्वप्न बघताय||आयएएस अधिकारी कसे व्हावे || How to Become a IAS Officer.

 16 ऑगस्ट

           IAS Officer आयएएस अधिकारी कसे व्हावे                                 'मोठं होऊन काय होणार?' हा प्रश्न बहुतांश लहान मुलांना विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर देताना अनेक लहान मुलं डॉक्टर (Doctor), इंजिनिअर (Engineer) अशी उत्तरं देतात मात्र काही मुलं मला IAS व्हायचंय असं उत्तर देतात. खरं म्हणजे IAS होणं सोपं आहे असं आपल्याला लहानपणी जरी वाटत असलं तरी ते अजिबात सोपं नाही हे आता लक्षात येतं. मात्र अशक्यही नाही. आपल्यात जर खरंच जिद्द असेल आपण IAS  होऊ शकतो. 

ही देशातील सर्वात मोठी सरकारी नोकरी आहे. IAS अधिकारी एक प्रभावी व्यक्ती असतो. हा अधिकारी सर्व विभागांना मार्गदर्शन करतो की कोणत्या विभागात कसं काम करावं. केंद्र सरकारचे सर्व सचिव आयएएस अधिकारी आहेत. केवळ एक IAS अधिकारी सर्व विभागांमध्ये सरकारी धोरणे लागू करतो. राष्ट्रपती आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करतात. म्हणूनच या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी असेही म्हटलं जातं. राज्य सरकार IAS अधिकाऱ्याला निलंबित करू शकते पण त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो.

IAS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं फार महत्वाचं आहे. सामान्य श्रेणीतील विद्यार्थी IAS परीक्षेसाठी 21 ते 32 वर्षांपर्यंत कोणत्याही वेळी 6 वेळा परीक्षा देऊ शकतात. ओबीसी विद्यार्थी ही परीक्षा 21 ते 35 वर्षांपर्यंत 9 वेळा देऊ शकतात. त्याच वेळी, SC आणि ST श्रेणीचे विद्यार्थी IAS परीक्षेसाठी वयाच्या 21 ते 37 वर्षांच्या वयात हव्या तेवढ्या वेळा परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे  भारत, नेपाळ किंवा भूतानचं नागरिक असणे अत्यंत महत्वाचं आहे. IAS होण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 परीक्षा द्याव्या लागतात. यातील पहिला प्रारंभिक परीक्षा, दुसरा मुख्य परीक्षा आणि तिसरा विभाग मुलाखत असतो.



                               

    

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्य दिन || Independence Day