Image
  22 डिसेंबर 2012 रोजी, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात घोषणा केली की, दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. . अशा प्रकारे दरवर्षी 22 डिसेंबर 2012 पासून देशभरात राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जात आहे.

स्वातंत्र्य दिन || Independence Day


15 ऑगस्ट 

    स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

        दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो  कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला.

अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते..

अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो.


 

Comments

Popular posts from this blog

IAS Officer होण्याच स्वप्न बघताय||आयएएस अधिकारी कसे व्हावे || How to Become a IAS Officer.

क्रांतिदिन || Krantidin